मुंबई : गिरगावातील केशवजी नाईक चाळीच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे १३१ वर्ष आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबईतील सर्वात पहिला गणेश उत्सव साजरा करण्यात आला. दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईमध्ये दाखल होणार असून या मंडळास सदिच्छा भेट देणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, "भारतीय समाजामध्ये एकी निर्माण व्हावी, जनजागृती व्हावी, सर्वांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यातूनच केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या परंपरेचा वारसा अविरत पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.