मुंबई : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स, गोरखपूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध मिळणार आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून येथील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दरम्यान, एम्स, गोरखपूर येथील भरतीच्या माध्यमातून “वैद्यकीय अधीक्षक, अधीक्षक अभियंता, निबंधक, कार्यकारी अभियंता (विद्युत), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहाय्यक परीक्षा नियंत्रक, सहायक प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल श्रेणी-१, कार्यालय अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक” पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
तसेच, या भरतीकरिता उमेदवारास अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ०५ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. त्याचबरोबर, भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.