डोंबिवली : समर्थ रामदासाचा यांचा सर्व विषयाचा चांगला अभ्यास होता. सर्व संतामध्ये समर्थ हे फार वेगळे होते . ते ठामपणे बोलायला कचरत नव्हते. प्रवचन, कीर्तन या माध्यमातून ते स्पष्ट बोलत होते. समर्थानी धर्मावर भर दिला आहे. आपल्याकडे संत म्हणजे भक्ती समोर येते. पण समर्थाकडे भक्ती नव्हती असे नाही. पण प्रामुख्याने भक्ती पेक्षा ही त्यांनी धर्माला प्राधन्य दिले आहे. सिध्दांत कधीही कालबाह्य होत नाही हा देखील सिध्दांत आहे. समर्थाचे काम व विचार लोकांर्पयत पोहोचविण्याचे काम लेखक सुरेश जाखडी यांनी या पुस्तकातून केले आहे असे मत भारताचार्य, धर्मभूषण प्रा. सु.ग. शेवडे यांनी व्यक्त केले.
येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
लेखक सुरेश जाखडी यांच्या ‘‘श्री समर्थ रामदास- एक अभ्यास’’ या पुस्तकाचे प्रकाशन ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या प्रेक्षागृहात रविवारी करण्यात आले. यावेळी अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक, प्रकाशक प्रा. शरयू जाखडी, मिताली इनामदार, डॉ. अस्मिता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. शेवडे म्हणाले, समर्थ रामदास धर्माविषयी ठामपणे होते. समर्थानी उघडपणे शिवाजी महाराजांना समर्थन ही दिले होते. शिवाजी महाराजांनी समर्थांना भेटायला गेले होते. त्यांची बोलणी झाली आहेत. तसेच वेद आणि विज्ञान याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, वेद हे प्रमाण आहे. वेदांचा सिध्दांत चुकीचा आहे असे बोलणारी एक ही व्यक्ती संत होऊ शकत नाही. आद्यशंकराचार्य ही खूप मोठी झालेली व्यक्ती आहे. त्यांनी आठव्या वर्षी संन्यास घेतला. त्यांनी खूप अभ्यास केला आहे. विज्ञान आज आले आहे. विज्ञान आपण स्वीकारत आलो आहे.विज्ञान शिकवले गेले आहे. वेदांतील एक सिध्दांत विज्ञानानुसार चुकीचा ठरला आहे हे दाखवून द्यावे असे आवाहान ही त्यांनी यावेळी केले.
वेद किती वर्षापूर्वीचे आहे यात विषयात न पडता विज्ञानातून न कळलेल्या गोष्टी वेदांमध्ये आहे. उदा. विज्ञानानुसार शब्द ऐकू येण्यासाठी हवेची गरज आहे. वारा असल्याशिवाय ऐकू येत नाही. याउलट वेदांमध्ये शब्दाचे माध्यम आकाश आहे असे म्हटले आहे. आकाश नसेल तर टीव्हीवरील बोलणे, मोबाईलमधील बोलणे ऐकू जाऊ शकत नाही. हे सर्व आकाशातून शक्य होत आहे. वेदामधील ग्रंथ सर्व मानवी जातीसाठी आहे. केवळ हिंदू धर्मासाठी नाही. धर्मग्रंथ हा मानवी जीवनाचे कल्याण करण्यासाठी आहे. व ज्यांनी ते नियम मोडले त्यांचे आपण अनुयायी होण्यास आपण तयार झालो आहे अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.
‘श्री समर्थ रामदास- एक अभ्यास’ हा ग्रंथ विकत घेऊन वाचला पाहिजे. सुंदर, शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. श्री समर्थ रामदास -एक अभ्यास असे सुंदर नाव देखील दिले आहे असे आवाहन ही शेवडे यांनी केले.
चंद्रशेखर टिळक म्हणाले, सातारा, कोल्हापूर, सांगली या परिसरातून सैन्यात मोठय़ा प्रमाणात भरती होत असते. ९२.८३ टक्क्यांहून अधिक भरती सैन्यात या जिल्ह्यातून होते तो देखील समर्थाचा परिणाम आहे का यांचे इतिहास ही या पुस्तकात आहे. सैन्य भरतीत त्या त्या भूभागाचा गुणधर्म असतो तो या तीन जिल्ह्यात आहे. भूभाग शोधून त्या भूभागाला साजेसे धोरण सांगणे व त्यांची अमंलबजावणी करणे यांची चुणुक या पुस्तकात आहे. समर्थाच्या राजकारण, अर्थकारण, समाजकारण याची नस सापडली आहे. या मुददयांचा ही पुढील पुस्तकांत विचार करा, असे ही ते म्हणाले.
सुरेश जाखडी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सांगितले, नवीन लेखकांना संधी दिली जात नाही. पण माझा कोणताही लेख परत आला नाही. मुंबई तरूण भारतमध्ये ते गेल्या पाच वर्षापासून लिखाण करीत आहे. या पुस्तकात दैनिक मुंबई तरूण भारताचा मोठा वाटा आहे, असे ही त्यांनी आवर्जुन सांगितले.