विद्यार्थी संख्या आणि गुणवत्तेत 'विद्या भारती'च्या शाळाही आता अग्रेसर! : डॉ. कृष्णगोपालजी

    24-Sep-2023
Total Views |
RSS Dr KrishnaGopalji On Vidya Bharti Schools

मुंबई :
"विद्या भारतीच्या विद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून समाजात ते प्रतिष्ठित झाले आहेत. विद्या भारतीने अनेक प्रांतात आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. विद्यार्थी संख्या आणि गुणवत्तेत आमच्या शाळा आता मागे नाहीत. त्यादेखील आता अग्रेसर होऊ लागल्या आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले. गोरखपूरच्या पक्कीबाग येथे 'विद्या भारती'ची अखिल भारतीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. तीन दिवस (दि. २२ ते २४ सप्टेंबर) झालेल्या या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली.

येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

डॉ. कृष्णगोपालजी म्हणाले, "माजी विद्यार्थ्यांशी सतत संपर्क ठेवण्याच्या उद्देशाने सर्व शाळांमध्ये प्रांत स्तरावर माजी विद्यार्थी परिषदेची स्थापन करण्यात आली आहे. यामुळे केवळ त्यांच्या मूल्यांचे पुनर्जागरण होत नाही तर ते विद्या भारतीच्या अनेक सेवा प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. माजी विद्यार्थी ही एक मोठी शक्ती आहे, त्या विद्यार्थ्यांशी जवळीक वाढवण्याबरोबरच त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद, भक्ती, कर्तव्य आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करण्याचे काम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केले जाते. माजी विद्यार्थी देखील पर्यावरण, पाणी, ऊर्जा संवर्धन, स्वावलंबी भारत आणि सामाजिक जागृतीच्या कार्यात सक्रिय योगदान देत आहेत."