मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत भारतास फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३९९ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले.
येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दरम्यान, भारताकडून शुभमन गिल ९७ चेंडूत १०४ धावा, श्रेयस अय्यर ९० चेंडूत १०५ धावा यांच्या शतकी खेळीनंतर के एल राहूल आणि सुर्यकुमार यादव अनुक्रमे ५२, ७२ या बहुमुल्य खेळीमुळे भारताला ४०० धावांचा डोंगर उभा करता आला. ऑस्ट्रेलियाकडून ग्रीन याने २ विकेट्स तर अबॉट, हेजलवूड आणि अॅडम झाम्पा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.