चीनच्या विस्ताराला लगाम लावण्यासाठी भारत-अमेरिका सैन्य सहकार्य वाढवणार
24-Sep-2023
Total Views |
मुंबई : भारत आणि अमेरिकेचे आर्थिक आणि सैन्य सहकार्य सतत वाढत आहे. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार नुकतेच चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, दोन्ही देशांच्या नौदलामध्ये हिंद-पॅसिफिक महासागर क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाली. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
अमेरिकेमध्ये झालेल्या २५ व्या आंतरराष्ट्रीय सीपॉवर सिम्पोजियम (आयएसएस) मध्ये भारताचे नौदल प्रमुख झाले होते. नौदल प्रमुखांच्या दौऱ्याची माहिती देताना भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले की, "नौदल प्रमुखांच्या यूएस दौऱ्यामुळे द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याची आणि हिंद-पॅसिफिक महासागर क्षेत्रातील विविध भागीदारांशी संवाद साधण्याची सर्वोच्च पातळीवरील महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे."
हिंद-पॅसिफिक महासागरात चीन सतत लहान देशांना धमकावत असतो. त्यामुळे नियम आधारित जल वाहतूक चालू ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी भारत आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पश्चिमात्य देश एकमेकांना सैन्य सहकार्य करत आहेत. चीनला रोखण्यासाठी भारताने अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासोबत मिळून क्वॉड नावाने एक गट स्थापन केला आहे.