तसेच, या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. दि. ०२ सप्टेंबर २०२३ पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली असून दि. २५ सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. या भरतीद्वारे एमआयडीसी, मुंबई अंतर्गत ८०२ रिक्त जागा भरल्या जातील.
या भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास अर्ज शुल्क भरावा लागेल. अधिसूचनेनुसार, खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी १ हजार रुपये तर मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी १०० रुपये अर्जशुल्क आकारले जाणार आहे.