मुंबई : भारतीय प्राद्योगिकी संस्था, कानपूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयआयटी, कानपूर येथील विविध पदांच्या एकूण '८५' रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
आयआयटी, कानपूर येथील भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून शिक्षकेतर पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्यासाठी उमेदवार दि. १६ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.तसेच, उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.