मुंबई : देशातील बँकिंग व्यवस्थेतील बँकांपैकी एक आयडीबीआय बँकेत तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. आयडीबीआय बँकेने नोकरभरती संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयडीबीआय बँकेतील 'कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक' पदावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
तसेच, आयडीबीआय बँकेतील 'कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक' पदाच्या एकूण ६०० जागा भरल्या जाणार आहेत. या सर्व जागा देशातील विविध ठिकाणच्या असणार आहेत. तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारास दि. ३० सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. तसेच, उमेदवारांस वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून किमान २० वर्ष तर कमाल २५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे.