मुंबई : गोरखपूरच्या पक्कीबाग येथील सरस्वती शिशु मंदिरमध्ये 'विद्या भारती'च्या अखिल भारतीय कार्यकारिणी बैठकीस सुरुवात झाली आहे. तीन दिवस (दि. २२ ते २४ सप्टेंबर) होत असलेल्या या बैठकीस देशभरातील १६० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी देखील या बैठकीस उपस्थित आहेत. देशभरातील कामाची एकूण परिस्थिती, कामाचे सक्षमीकरण, शैक्षणिक गुणवत्ता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, सामाजिक बदल, इ. विषयांवर बैठकीदरम्यान चर्चा होणार आहे.
डॉ.कृष्ण गोपाल यांच्या हस्ते माता सरस्वतीसमोर दीपप्रज्वलन करून बैठकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी विद्या भारतीचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री यतींद्रजी आणि पूर्व उत्तर प्रदेश क्षेत्राचे प्रदेश संघटनमंत्री डोमेश्वरजी कुमार देखील उपस्थित होते. 'विद्या भारती' ही देशातील शिक्षण क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून हजारोहून अधिक शैक्षणिक संस्था सध्या कार्यरत असून देशाच्या विविध राज्यांमध्ये संस्थेचे काम चालू आहे. विद्या भारती शिक्षणाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च अशा सर्व स्तरांवर कार्यरत आहे.