मुंबई : अॅपल ने १२ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्निया येथे झालेल्या इव्हेंटमध्ये आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली होती . काही दिवसांपूर्वी त्याचे प्री-बुकिंग सुरु झाले होते. आता याची आजपासून विक्री सुरू होणार आहे. यासाठी मुंबईच्या अॅपल स्टोअरमध्ये लोकांनी आयफोन विकत घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. याची किंमत ही ७९,९९० ते १,९९,९९० रूपयांपर्यंत आहे. आयफोन १५ सिरीजमधील मॉडेल्सची खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी मुंबई आणि दिल्लीमधील अधिकृत रिटेल स्टोअर्समध्ये गर्दी केली आहे. अॅपल स्टोअरमध्ये लॉन्च झालेले नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली आहे. भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरमध्ये पहिला नवीन आयफोन घेण्यासाठी खरेदीदारांना १७ तास रांगेत प्रतिक्षा करावी लागली.
काय आहे खास ?
आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसमध्ये A17 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर आयफोन १५ प्रो मॉडेलमध्ये सर्वात शक्तिशाली अशा A17 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स देखील सादर केले आहेत. कंपनीने आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अॅक्शन बटण दिले आहे. ज्याचे मदतीने वापरकर्त्यांना अनेक कामे करता येणार आहेत. कंपनीने आयफोन १५ व १५ प्लस पाठोपाठ आयफोन १५ प्रो सिरीज लॉन्च केली आहे. यामध्ये टायटॅनियम बॉडीचा वापर करण्यात आला आहे. बेजट देखील कमी करण्यात आले आहे.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!