'नारी शक्ती वंदन कायदा' महिला शास्त्रज्ञांसाठी भेट : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

    21-Sep-2023
Total Views |
Union Minister Rajnath Singh On Women's Reservation Bill

नवी दिल्ली :
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर राज्यसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, चांद्रयान ३ सारख्या मोहिमांच्या माध्यमातून इस्रोने देशाचा गौरव केला आहे. त्यामुळे नारी शक्ती वंदन कायदा ही महिला शास्त्रज्ञांसाठी भेट आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यसभेत म्हणाले.

दरम्यान, चांद्रयान-३ च्या यशावर महिला आरक्षण विधेयक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत मांडले. महिला आरक्षण विधेयक ही देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांना मिळालेली एक प्रकारची भेट असून त्यांना भारताकडून ही विशेष भेट देण्यात येत असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.