महिला आरक्षण विधेयक मंजूर होणं हा ऐतिहासिक क्षण : खा. प्रियंका चतुर्वेदी

    21-Sep-2023
Total Views |
MP Priyanka Chaturvedi On Women's Reservation Bill

नवी दिल्ली :
देशाच्या इतिहासात महिलांसाठी आरक्षण हवे यासाठी संसदेत आवाज उठविला गेला आहे. महिला आरक्षणासाठी गेली ७० वर्षे लढा दिला गेला. परंतु, आजचा दिवस महिलांना अखेर आरक्षण दिले गेले आहे. आणि या क्षणाचा आपण साक्षीदार असून मी स्वतःला भाग्यवान समजते, असे राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

दरम्यान, महिला आरक्षण विधेयक मंजूर होणं हा देशाच्या संसदेतील ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. तसेच, केंद्र सरकारकडून महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेच्या पटलावर मांडले गेले. त्यात विरोधकांकडून सहभाग नोंदविला गेला. खा. प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयकाचे समर्थक असणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.