BYJU'S चे भारताचे सीईओ म्हणून अर्जुन मोहन यांची नियुक्ती

    21-Sep-2023
Total Views |
Arjun Mohan
 
 BYJU'S चे भारताचे सीईओ म्हणून अर्जुन मोहन यांची नियुक्ती
 
मुंबई:एज्युकेशन टेक स्पेशालिस्ट BYJU's ने भारताचे सीईओ ( मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून अर्जुन मोहन यांची नियुक्ती केली आहे.कंपनीच्या भारतातील व्यवसायिक ऑपरेशनचा पदभार आता अर्जुन मोहन सांभाळणार आहेत.याआधी संस्थापक सदस्य व माजी भारतीय बिझनेस हेड म्हणून मृणाल मोहित कार्यरत होते.
 
 
मोहन हे देखील संस्थापक सदस्य असून BYJU'S चे माजी व्यवसाय प्रमुख आहेत.आता त्यांनी कंपनीत पुनरागमन केले आहे. याआधी त्यांनी टेक जायंट upGrad मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले आहे.
 
 
कंपनीच्या लेखापरीक्षकाने दिलेला राजीनामा,काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे,कर्मचारी कपात अशा कठीण आव्हानात्मक परिस्थितीला तोंड अर्जुन मोहन यांना द्यावे लागणार आहे.'मी या कार्यभारासाठी सज्ज असून कंपनीच्या वाढीसाठी मी पूर्ण प्रयत्न करेन 'अशी प्रतिक्रिया अर्जुन मोहन यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.