महिला आरक्षण विधेयकास काँग्रेसकडून समर्थन : के. सी. वेणुगोपाल

    21-Sep-2023
Total Views | 17
INC MP K. C. Venugopal Women's Reservation Bill

नवी दिल्ली :
लोकसभेत महिला आरक्षण विधेयेक संमत झाल्यानंतर राज्यसभेत केंद्र सरकारकडून विधेयक मांडण्यात आले आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा करण्यात येत आहे. काँग्रेस राज्यसभा खासदार तथा सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी महिला आरक्षण विधेयकाचे समर्थन केले असून त्यांनी महिला आरक्षण विधेयकास पाठिंबा दिला आहे. के. सी वेणुगोपाल म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून अजून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून महिला आरक्षण विधेयकास पाठिंबा असून त्यात कुणाचेच दुमत नसल्याचे के. सी. वेणुगोपाल यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, काँग्रेस खा. के. सी. वेणुगोपाल म्हणाले, केंद्र सरकारला महिला आरक्षण विधेयक आणण्यास ९ वर्षांचा काळ का लागला, असा सवाल के. सी. वेणुगोपाल यांनी सरकारला विचारला. तसेच, काँग्रसेकडून पुन्हा एकदा संघाचा उल्लेख करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तसेच, राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याकडूनदेखील के. सी. वेणुगोपाल यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. ते म्हणाले, ही मिली भगत आहे का, असा सवालही राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी काँग्रेस खा. के. सी. वेणुगोपाल यांना विचारला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121