मुंबई : राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशोत्सव काळात प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीला भाविकांची मोठी रांग लागली आहे. भक्तांकडून सिद्धिविनायक मंदिरात भक्तांकडून मिळणाऱ्या दानात यंदा विलक्षण वाढ झाली आहे.
मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपतीला एका भक्ताने तब्बल पाऊण किलो सोन्याचा हिरेजडीतांनी मढविलेला मुकुट अर्पण केला आहे. सिद्धिविनायक बाप्पाच्या दरबारी एका भक्ताची मनोकामना पूर्ण झाली. त्यामुळे त्या निनावी भक्ताने सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी पाऊण किलोचा सोन्याचा मुकुट दान केला आहे. दान करण्यात आलेल्या मुकुटाची किंमत ही लाखोंच्या घरात असल्याचे बोललं जातंय. भाविकाने हा मुकुट दान केल्यांनतर त्याला श्रींच्या डोक्यावर हा मुकुट ठेवण्यात आला. हा मुकुट पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली.
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. केंद्रीय स्तरापासून ते स्थानिक राजकारणातील बडे नेते इथे बाप्पाच्या आशीर्वादासाठी येतात. सिद्धीविनायक मंदिरात मंगळवारी मोठी गर्दी असते. गणेशोत्सव दरम्यान सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची मोठी रांग लागते. सोना चांदीच्या दागिन्यांनी बाप्पाची दानपेटी भरून वाहत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
https://bit.ly/3RpZbSq