मोदी सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबध्द : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी

महिला आरक्षण विधेयक राजकीय नेतृत्वासाठी महत्त्वपूर्ण

    20-Sep-2023
Total Views |
Women and Child Welfare MInister Smriti Irani On Women's Reservation Bill

नवी दिल्ली :
विशेष संसद अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु असून महिला व बाल कल्याण विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या नेतृत्वात देशातील तरुणींसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्यासाठी देशाच्या इतिहासात राष्ट्रीय शिक्षण निधीमध्ये मुलींसाठी वेगळ्या स्वरुपात निधीची तरतूद करण्याची व्यवस्था मोदी सरकारच्या काळात झाल्याचे केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती ईराणी म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, देशात धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद करण्यात आली नाही. तसेच, देशात विरोधकांकडून संभ्रम पसरविला जात असून त्याचे खंडन करण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी तथ्यांचा पाढा संसदेत वाचून दाखविला.

दरम्यान, केंद्र सरकारचा निर्णय महत्त्वपूर्ण असून समस्त भारतीय महिला याबद्दल सरकारच्या ऋणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही राष्ट्रहितासाठी काम करण्याची शपथ घेतली. त्यादिशेने काम करत राहिलो. तसेच, मोदी सरकारचे मोठे योगदान महिला सशक्तीकरणासाठी असून महिलांच्या उत्थानासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, असे स्मृती ईराणी म्हणाल्या. मोदी सरकारच्या काळात महिला सक्षमीकरण हा प्रमुख मुद्दा राहिला असून महिला नेतृत्वासाठी आमचे सरकार कटिबध्द असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी म्हणाल्या.

तसेच, गेल्या ६० वर्षांत विरोधकांनी देशाला लुटले असून त्यावेळी योग्य पावले उचलली गेली असती तर देश आज प्रगतीपथावर असता, असे पंतप्रधानांनीदेखील म्हटले आहे. असे स्मृती ईराणी म्हणाल्या. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात महिलांसाठी शौचालये बांधण्यात आली. तसेच, २०१३-१४ साली जेंडर बजेट ९० हजार कोटी तर मोदी सरकारच्या काळातील म्हणजेच २०२३-२४ २ लाख २३ हजार कोटी असल्याचा उच्चार केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी म्हणाल्या.

तसेच, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, मी नारी शक्ती वंदन करत कायद्याला सलाम करते. मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता असून, ज्यांना माझ्यासारख्या एका व्यक्तीस संघटनेने असाधारण संधी दिली आहे, जेणेकरून मला संघटनेच्या माध्यमातून संविधानाच्या मर्यादेत देशसेवा करता येईल. त्याचबरोबर, महिलांना आरक्षण देणारा भाजपक् हा पहिलाच पक्ष ठरला असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी म्हणाल्या. 

माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या संसदेतील योगदानबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आभार मानताच महिला आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या योगदानाबाबत भाष्य केले. त्याचबरोबर, नरसिंह राव यांच्या तत्कालीन सरकारने महिला आरक्षणाबाबत संसदेत स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिला आरक्षणाबाबत महत्तवपूर्ण निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी म्हणाल्या.