नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारकडून महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षासमवेत सत्ताधारी पक्षाकडून चर्चासत्र पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. यावेळी गृहमंत्री अमित शाहांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, मोदी सरकारने उज्ज्वला योजना, महिलांसाठी स्वच्छतागृहे निर्माण करून महिला सक्षमीकरणाला चालना दिली. तसेच, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महिलांच्या प्रश्नांचा अंत या विधेयकांच्या माध्यमातून झाला आहे. तसेच, काल संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात आले. त्यामुळे कालचा दिवस ऐतिहासिक असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तसेच, मोदी सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबध्द असून भाजपने कधीच या गोष्टीचे राजकारण करत नसल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना स्पष्ट केले.
तसेच, डरो मत असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी यावेळी विरोधकांना आवाहन केले. महिला सक्षमीकरण हा राजकीय मुद्दा नसून काहींसाठी तो राजकारणाचा विषय असल्याचा टोला अमित शाहांनी विरोधकांना लगावला. तसेच, एससी, एसटी वर्गांत महिलांना आरक्षण असून इतर प्रवर्गांतील महिलांनादेखील आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, नव्या विधेयकानुसार,
३०३, ३० अ द्वारे लोकसभेत तर ३३२ अ द्वारे विधानसभेत महिलांना आरक्षित जागा असणार आहेत.
दरम्यान, महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील महिलांचा यथोचित सन्मान केल्याचे केंद्रीय मंत्री अमति शाह यावेळी म्हणाले. तसेच, मोदी सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या. जनधन योजनेतून ५२ कोटी खाते उघडले गेले. यात ३० कोटींहून अधिक खाते हे महिलांचे असल्याचे अमित शाह म्हणाले.