नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून महिला आरक्षण विधेयकावर चर्चा केली जात आहे. भारताची प्रख्यात ऍथलीट अंजू बॉबी जॉर्ज म्हणाली, "मला नवीन संसदेला भेट देण्याची संधी मिळाली याचा मला खरोखर आनंद असून महिला आरक्षण विधेयक मंजूर होत असताना हा एक महत्त्वाचा दिवस असल्याचे अंजू बॉबी म्हणाल्या.
दरम्यान, अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज पुढे म्हणाल्या, मला माझी भावना कशी व्यक्त करावी हेच कळत नाही. मंत्रालय आणि आपल्या पंतप्रधानांबद्दल कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. तसेच, महिला आरक्षण विधेयकामुळेमला वाटते की भारतात एक नवीन क्रांती घडणार असल्याचा विश्वास अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज यावेळी म्हणाल्या.