मुंबई : भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे.
पीएसएलव्ही रॉकेटच प्रक्षेपण झाल्यानंतर उपग्रह जवळपास २५ मिनिटात कक्षेत सोडला जातो. पण आदित्य एल १ला कक्षेत स्थापित करायला अंदाजे ६३ मिनिटे लागणार होती.
काही वेळापूर्वी इस्रोने ट्विटरवरुन यानाने उपग्रह अचूकपणे त्याच्या इच्छित कक्षेत सोडला आहे. भारतातील पहिल्या सौर वेधशाळेने सूर्य-पृथ्वी एल १ बिंदूकडे आपला प्रवास सुरू केला आहे, अशी माहिती दिली आहे.
तसेच आदित्य एल १च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन इस्रोचे वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सना शुभेच्छा दिल्या आहेत.