भारताची 'सुर्य'झेप! आदित्य L 1 सूर्याच्या दिशेने झेपावलं
02-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या सूर्य मोहीमेला प्रारंभ झाला आहे. आदित्य L 1 हे सॅटलाइट सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन लॉन्चिंग झालं. PSLV रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण झालं. PSLV रॉकेटच प्रक्षेपण झाल्यानंतर उपग्रह जवळपास 25 मिनिटात कक्षेत सोडला जातो. पण आदित्य L 1 ला कक्षेत स्थापित करायला अंदाजे 63 मिनिट लागतील.
सूर्याच्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी या उपग्रहाला 125 दिवस लागतील अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली. म्हणजे जवळपास 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. सर्वकाही ठरवल्यानुसार व्यवस्थित घडलं, तर आदित्य एल-1 हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करेल. सूर्याच्या कक्षेतील पाच पॉइंटपैकी हा एक पॉइंट आहे. पार्किंग स्पॉट म्हटलं तरी चालेल. L1 पॉइंटवरुन आदित्यच कुठल्याही अडथळ्याविना पूर्णवेळ सूर्यावर लक्ष राहील. सूर्यावर जे काही घडेल, त्याचे पृथ्वीवर काय परिणाम होतात, याच डिटेलमध्ये अभ्यास करता येईल. चांद्रयान-3 प्रमाणे आदित्य सुरुवातीला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल. काही राऊंड मारल्यानंतर 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 पॉइंटच्या दिशेने कूच करेल. त्या पॉइंटवर भ्रमण करताना आदित्य एल 1 सूर्याच्या बाहेरील थराबद्दल माहिती देईल.
PSLV-C57 रॉकेट आदित्य L1 सॅटेलाइटला पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडेल. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये L1 बिन्दु आहे. त्याला हॅलो ऑर्बिट म्हटलं जातं. तिथे आदित्य एल-1 ला स्थापित केलं जाईल. आदित्य एल-1 च आयुष्य पाच वर्षांच असेल. तो इतकी वर्ष सूर्याभोवती फेऱ्या मारेल. सूर्यावरील वादळं, सूर्यावरील कोरोना आणि अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल.आदित्य L 1 मिशनचा खर्च 400 कोटी रुपये आहे. NASA ला सूर्य त्याच सूर्य मोहीमेसाठी 12,300 कोटी रुपये खर्च आला होता. चांद्रयान मोहिम सुद्धा भारताने अत्यंत कमी खर्चात यशस्वी करुन दाखवली होती. फक्त 600 कोटीच्या घरात या मिशनसाठी खर्च आला होता.