मुंबई : भारतासह इतर देशांचे लक्ष लागलेल्या 'आदित्य एल १' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश तळावरून झाले आहे. त्यामुळे आजपासून भारत सूर्य वारीला निघाला आहे असे म्हणावे लागेल.
चांद्रयानाप्रमाणेच हे यानही सुरुवातीला पृथ्वीच्या कक्षेत परिभ्रमण करेल. दुसऱ्या टप्प्यात यान पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून बाहेर जाईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल.
अशाप्रकारे पाच टप्प्यांमध्ये सूर्यापर्यंतचा प्रवास होणार आहे. हे पाच टप्पे पूर्ण होण्याकरता चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यानंतर तब्बल पाच वर्षे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वांत बाहेरील थराचा अभ्यास केला जाणार आहे.