‘युटी’चे ‘युके’ कनेक्शन!

    14-Sep-2023
Total Views |
Eknath Shinde about Uddhav Thackeray London property mention Rishi Sunak

मला तर आता लंडनचीच स्वप्न पडायला लागलीत. तसेपण भारतात नो-नो ‘इंडिया’मध्ये हो ‘भारत’ या देशाच्या नावाला आपल्या आघाडीचा विरोध आहे ना? त्यामुळे ‘इंडिया’मध्ये म्हणतो; तर ‘इंडिया’मध्ये पंतप्रधानपदासाठी किती स्पर्धा आहे. राहुल आहे, त्यांची मम्मी आणि बहीणदेखील आतून इच्छुक असणारच. तिकडे ते लालू, नितेश, केजरीवाल आणि ममता बॅनर्जींना ताई म्हणू की, कारण त्यांनी मला आणि आदू बाळालादेखील राखी बांधली, तर ममता बॅनर्जी ते दक्षिण भारतातील सगळे नेते सगळ्यांना पंतप्रधान बनायचं आहे. हो, आपले शरद काका तर केव्हापासून शर्यतीत आहेत. माझा नंबर कधी येणार? मी ठरवलं. ब्रिटनमध्ये नंबर लावूया. ते ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत ना? ते जर तिकडे पंतप्रधान झाले. मग आपण तर काय भारतीयच आहोत. मोदींनी इतका मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. पण, त्या कार्यक्रमात ऋषींनी विचारले कुणाबद्दल तर ‘युटी’बद्दल. ‘युटी’ म्हणजे? ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणत सगळा महाराष्ट्र फेसबुक लाईव्ह चालवणारे वन अ‍ॅण्ड ओन्ली. माझ्यासारखा मीच. कुठे आहेत ते कमळवाले? आता त्या देवेंद्र कमळवाल्यांना बघा कसं, टुकटुक करून दाखवतो. हे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आम्हाला विचाारले तुम्हाला नाही. आणखीन एक गंमत. ऋषी सुनक यांनी हे कुणाला विचारले माहितीये का? त्या शिंदे ना. त्यांना आम्ही रिक्षा ड्रायव्हर म्हणतो? ते ४० लोक त्यांना नेता मानतात. बघा म्हणाव तुम्ही गेलात आणि अगदी आम्ही ‘हम दो हमारे दो’ जरी राहिलो ना तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कारण, प्रत्यक्ष ऋषी सुनकना भारतात आल्यावर आमची आठवण काढावीच लागते. काय म्हणता ऋषी सुनक यांनी शिंदे यांना अजिबात आमच्याबद्दल विचारले नाही? काय म्हणता, मध्यमवर्गीय कष्टकरी कुटुंबातून आलेल्या एकनाथ शिंदे यांना आम्ही कायमच कमी लेखतो. मुख्यमंत्री असतो तर आपणही ‘जी २०’ मध्ये दिमाखात कटीवर हात ठेऊन उभे असतो. हा विचार आमच्या मनाला सारखा खात आहे. त्यातूनच आम्ही विचारले की, ‘जी २०’ मध्ये शिंदे ऋषी सुनक यांच्याशी कोणत्या भाषेतून काय बोलले. असू दे बरं मग? काय म्हणता शिंदे म्हणतात की, ऋषी सुनक यांनी त्यांना सांगितले की, ब्रिटनमध्ये दरवर्षी आम्ही थंड हवा खायला जातो आणि संपत्ती जमवतो. काय म्हणता शिंदे म्हणाले की, त्यांना सगळे माहिती आहे. अरे थांबवा रे कुणी तरी हे सगळे. त्या देवेंद्रला कळले तर?

एकपात्री प्रयोग करा...

जितेंद्र आव्हाड मुंब्रा-कळव्यातील तरुणांसाठी ‘जवान’ चित्रपट विनाशुल्क दाखवणार आहेत म्हणे. जितेंद्र आव्हाड यांना अगदी आतून ओळखणारे लोक म्हणजे ज्यांना ‘सेव्ह गाझा’ म्हणणार्‍या जितेंद्र यांची हिंदू धर्म श्रद्धेबद्दलची पुरोगामित्वाच्या नावावरची फालतू मत माहिती आहेत ती लोक. ती लोक ज्यांनी करमुसेच्या पाठीवरच्या जखमा आणि मुंब्य्रामध्ये दहशतवादी इशरत जहाँच्या नावे चालवली गेलेली नावापुरताची चालणारी रूग्णवाहिका पाहिली आहे. या सगळ्या लोकांचे म्हणणे आहे की, जितेंद्र ‘जवान’ चित्रपट विनाशुल्क का दाखवणार आहेत. मागे ‘द केरला स्टोरी’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ हे ‘जवान’ चित्रपट हिंदुत्ववाद्यांनी विनाशुल्क प्रदर्शित केले. हिंदू धर्म, समस्या, अत्याचार यावर अभिव्यक्त होणार्‍या ‘जवान’ चित्रपटांला प्रसिद्धी मिळाली. हे पाहून आव्हाड यांना काय वाटले? उत्तर जनतेला माहिती आहे. हिंदू आणि देशाभिमानी अभिव्यक्ती असलेल्या ‘जवान’ चित्रपटांच्या विरोधात उभे राहण्यासाठी काहीतरी हवे ना? त्यामुळेच जितेंद्र यांनी ‘जवान’ चित्रपटाचा टेकू घेतला. तर काही लोक म्हणतात, सर्वच मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेल्या मुंब्य्रातील जनतेनेेे एक टक्का जरी विचार केला की, आपण कुणाला आणि कशासाठी निवडून द्यायचे, तर जितेंद्र आव्हाड यांना किती मत मिळतील? आता तर राष्ट्रवादीतही खुलेआम गट पडले. त्यात अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांचे सौख्य जगजाहीर. हे सगळे विचारात घेतले, तर आपले काय होणार? असे जितेंद्र आव्हाड यांना वाटत असावे. त्यामुळेच ‘जवान’ चित्रपट विनाशुल्क प्रदर्शित करून जनतेपर्यंत पोहोचण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. आता यावर काही लोक असेही म्हणतात की, ‘जवान’ चित्रपट दाखवण्याची काय गरज आव्हाड काय कमी नाटक करतात? पवारांचे राजीनामा नाट्य सुरू असताना आव्हाडांचे काय ते रडणे, हिंदूंवर टीका करताना काय तो आवेश. या सगळ्यांचे एकपात्री प्रयोग आव्हाडांनी करायला हवेत. कुणी नाही तरी त्यांच्या मतदार संघात राहणारे मात्र गाझापट्टीत प्राण गुंतलेले लोक. हे एकपात्री प्रयोग पाहून आव्हाडांना नक्कीच मतदान करतील. कारण, त्या लोकांचे आणि आव्हाडांचे या हृदयीचे त्या हृदयीचे नाते आहे. आता लोकांचे हे सांगणे आव्हांडापर्यंत कसे पोहोचवायचे?

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.