ठाणे परिक्षेत्रात ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टच्या उड्डाणास बंदी

    14-Sep-2023
Total Views |
Drone Paragliding Ban In Thane Circle

ठाणे :
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्वपरवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास १६ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या ६० दिवसांच्या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे.

अशी माहिती प्रभारी ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त राजेंद्रकुमार दाभाडे यांनी दिली.दरम्यान, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारे भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद आहे.