मुंबई : 'बंगाल गॅस कंपनी लिमिटेड' अंतर्गत विविध पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरूणांना नोकरीची संधी मिळणार आहे. 'बंगाल गॅस कंपनी लिमिटेड' अंतर्गत विविध रिक्त पदांबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ०३ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी पदाच्या एकूण ०६ जागा तर कंपनी सचिव, एचआर, कायदा, बीआयएस, फायनान्स आणि फायर अँड सेफ्टी या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच, या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून ही सर्व पदे निश्चित कालावधीसाठी भरली जातील. अधिक माहितीसाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.