आरक्षण प्रश्नावर 'अशोक चव्हाण' यांना आंदोलकांनी घातला घेराव; काळे झेंडे दाखवून केला विरोध
10-Sep-2023
Total Views |
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. या आंदोलनाचे केंद्र जालन्यातील अंतरवली सराटी हे गाव असले तरी, राज्यभरात मराठा समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. काहीदिवसांपूर्वीच आंदोलकांनी शरद पवार यांचा ताफा अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. असाच काहीसा प्रकार आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत घडला आहे.
नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एक सभा होती. याच सभेत अशोक चव्हाण यांना आंदोलकांनी आरक्षणाच्या प्रश्नावर घेराव घातला. त्यासोबत आंदोलकांकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.