'FTII'च्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची नियुक्ती

    01-Sep-2023
Total Views | 237
R Madhavan is new FTII President

नवी दिल्ली
: अष्टपैलू सिनेअभिनेते रंगनाथन माधवन अर्थात आर. माधवन यांची पुणेस्थित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. दरम्यान, या सन्मानासाठी आपण मनापासून आभार मानत असून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे माधवन यांनी म्हटले आहे.

माधवन यांची नियुक्ती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे. याबाबत मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही माधवन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी माधवन यांच्या ‘रॉकेट्री - नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, एफटीआयआयचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून आर. माधवन यांचे हार्दिक अभिनंदन. मला आशा आहे की संस्थेला तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होईल. आपण या संस्थेला अधिक उंचीवर नेऊ, असाही विश्वास वाटतो.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121