मुंबई : भारतीय रेल्वेच्या १६६ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेकडे कामकाजाचा भार सोपावण्यात आला आहे. जया वर्मा सिन्हा या आजपासून भारतीय रेल्वेच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन पदभार स्विकारणार आहेत.
जया वर्मा सिन्हा १९८६ मध्ये रेल्वेमध्ये कामास रुजू झाल्या. जया वर्मा सिन्हा या इलाहाबाद युनिर्व्हसिटीच्या माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी रेल्वे प्रशासनात विविध विभागात आणि विविध पदांवर गेली ३६ वर्ष काम केलं आहे. त्यामुळे त्यांना भारतीय रेल्वेचा दांडगा अनुभव आहे.
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडळ एक्सप्रेस दुर्घटनेच्या वेळी जया वर्मा सिन्हा यांनी प्रशंसनीय कामगिरी केली होती. त्यानंतर आता त्यांनी हा पदभार स्विकारून नवीन इतिहासच रचला आहे.