‘ओएमजी २’च्या अडचणीत आणखी भर, महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी धाडली नोटीस

    09-Aug-2023
Total Views | 76
 
omg 2
 
 
 
 मुंबई : ‘ओएमजी २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अगदी जवळ आली अशूनही चित्रपटाच्या अडचणी थांबण्याचे नाव काही घेत नाही आहे. अलीकडच्या काळात अभिनेता अक्षय कुमारच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांच्या नापसंतीचा सामना करावा लागला आहे. यात आता ‘ओएमजी २’ या चित्रपटाची भर पडणार असे दिसून येत आहे. या चित्रपटावरुन अक्षयला आता महाकाल मंदिराचे पुजारी यांनी खडसावले आहे. त्यांनी चित्रपटाचे मेकर्स आणि अक्षयला कायदेशीर नोटीस देखील पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
 
एकीकडे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटामध्ये २७ कट्स सांगितले होते. तर महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘ओएमजी २’ चा ट्रेलर पाहिल्यानंतर महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, या चित्रपटामध्ये महाकालशी संबंधित जे सीन्स आहेत ते काढून टाकावेत. महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी महेश शर्मा यांनी उज्जैनमधील जनहित याचिकेत एक अर्ज याबाबत सादर केला आहे. याशिवाय त्यांनी मेकर्सला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. पुढे ते म्हणाले की, “देवाला तुम्ही ज्याप्रकारे सादर करत आहात ते चूकीचे आहे. निर्मात्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. त्यांनी जे काही केले आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकं आणि भक्त यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भगवान शंकर कचोरी घेताना दाखवणे हे कितपत बरोबर आहे यामुळे भावना दुखावल्या गेल्या”, असे महेश यांनी म्हटले आहे.
 
‘सम्राट पृथ्वीराज चौहान’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘बच्चन पांडे’, ‘रामसेतू’, या चित्रपटांवरुन अक्षयला वादाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता त्याच्या ‘ओएमजी २’ वरुनही वाद सुरु झाला आहे. इतकेच नाही तर अक्षयच्या इतक्या वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दित पहिल्यांच त्याच्या चित्रपटाचा सेन्सॉर बोर्डाने अ श्रेणी दिली आहे. त्यामुळे ११ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित होणाऱ्या ‘ओएमजी २’ या चित्रपटाला आता आणखी कोणत्या गोष्टांना सामोरे जावे लागेल हे येणारा काळच ठरवेल.
येत्या शुक्रवारी बॉलीवूडमध्ये मोठा धमाका होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा गदर २ आणि अक्षय कुमारचा ओएमजी २ प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यानं त्यात कुणाची सरशी होणार याकडे प्रेक्षकांचे, चाहत्यांचे आणि नेटकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121