"हनुमानाने लंका जाळली नाही..."; ऐका राहुलबाबांचे रामायण!

    09-Aug-2023
Total Views |
RAHUL GANDHI
 
नवी दिल्ली : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी ही अविश्वास ठरावावर आपलं मत मांडल. संसद सदस्यत्व बहाल झाल्यानंतर राहुल गांधींच हे पहिलेच भाषण होते. या भाषणात त्यांनी रामायणाविषयी काही आक्षेपार्ह विधान केली.
 
 
 
राहुल गांधी म्हणाले की, रावणाच्या लंकेला हनुमानाने आग लावली नव्हती, रावणाच्या अंहकारामुळे लंका जळाली. पुढे बोलताना ते म्हणाले की, रामाने रावणाचा वध केला नव्हता. रावणाचा वध त्याच्याच अंहकाराने झाला होता. रावणही फक्त दोनच लोकांच ऐकायचा. आज मोदीही फक्त दोनच लोकांच ऐकतात.
 
राहुल गांधींनी आपल्या भाषणात भारत जोडो यात्रेदरम्यान आलेल्या अडचणींचा पाडाही वाचला. ते म्हणाले की, मी रोज १० किलोमीटर धावतो. त्यामुळे मला वाटले होते की, मी सहज ५० किलोमीटर चालू शकतो. पण दोन दिवसानंतर माझ्या गुडघ्यात प्रचंड वेदना सुरु झाल्या.