नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर चांगलीच टीका केली. सुप्रिया सुळेंनी भाजपाने ९ वर्षाच्या काळात ९ राज्यातील सरकार पाडले, असे विधान केले होते.
त्यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, "काल सुप्रिया सुळेंनी आमच्यावर ९ राज्यातील सरकार पाडल्याचा आरोप केला. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात सरकार पाडून मुख्यमंत्री होण्याची सुरुवात खुद्द तुमचे वडील असलेल्या शरद पवार यांनीच केली होती.
अमित शाहंच्या या विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी मधातच अमित शाहच्या विधानावर प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आले नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, शरद पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडत. पुलोदचे सरकार स्थापन केले होते. त्याचीच आठवण अमित शाहंनी आज सुप्रिया सुळेंना करुन दिली.