अवघ्या ५ रुपयांत होणार नवी मुंबईकरांचा प्रवास गारेगार
08-Aug-2023
Total Views |
मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडून एसी बससेवा नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना अवघ्या ५ रुपयांत गारेगार प्रवास करता येणार आहे. दरम्यान, ही बससेवा पहिल्या टप्प्यात वाशी ते कोपरखैरणे यादरम्यान चालविण्यात येणार आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर पालिकेकडून एसी बससेवेचा विस्तार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या यानिर्णयामुळे बेस्टच्या धर्तीवर नवी मुंबईकरांना बससेवा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या एकूण ६०० बसेस सध्या धावत असून २,८०० कर्मचाऱ्यांवर या बससेवेची मदार आहे. तर जवळपास ३ लाख नवी मुंबईकर या बससेवा नियमित वापर करतात. तसेच, ५० तिकीट तपासनीस कार्यरत असून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अधिक दंड आकरला जात आहे. एकंदरीत, महापालिकेच्या या प्रयोगामुळे किंमती माफक ठेवून दर्जेदार बससुविधा देण्याकडे कल आहे. त्यामुळे पालिकेच्या परिवहन विभागाचा महसूल वाढण्यास मदत मिळणार आहे.