नवी दिल्ली : रिलायन्स म्हणल की डोळ्यासमोर अंबानी परिवार येत.स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतरही कंपनीचा डोलारा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मुकेश अंबानी यांचे नाव भारतातच नाही जगभरातील पहिल्या पाच श्रीमंतांचा यादीत आहे.मुकेश अंबानी यांना 2029 पर्यंत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ देण्यासाठी शेअर होल्डरची कंपनीने परवानगी मागितली आहे.
६६ वर्षीय अंबानी हे कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदासाठी कंपनी कायद्यानुसार ७० वर्षांचे वय ओलांडणार असून,त्यांची नियुक्ती या वयोगटाच्या पलीकडे होण्यासाठी भागधारकांनी विशेष ठराव करण्यासाठी कंपनी प्रयत्न करेल.अंबानी १९७७ पासून रिलायन्सच्या संचालक मंडळावर आहेत आणि जुलै २००२ धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांना कंपनीच्या अध्यक्षपदी बढती देण्यात आली. रिलायन्सने शेअरहोल्डर्सना पाठवलेल्या विशेष ठरावात म्हटले आहे की,21 जुलै 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने मुकेश डी.अंबानी यांची व्यवस्थापकीय संचालक पदी पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली.
रिलायन्सने म्हटले आहे की, अंबानी 19 एप्रिल 2027 रोजी 70 वर्षांचे होतील.त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची अनेक पटींनी वाढ झाली असून वयाच्या ७० व्या वर्षांनंतरही ते कंपनीचे नेतृत्व करत राहणे कंपनीच्या हिताचे आहे. त्यानुसार प्रस्तावित विशेष ठराव पारित करण्यासाठी बोर्डाने संमत सदस्यांची (भागधारकांची)मंजुरी घेतली.
त्यानुसार विशेष ठराव म्हणून संमत करण्यासाठी सदस्यांची मंजुरी घेण्यात आली.
या तीन वर्षांत अंबानी यांनी रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या भूमिकेसाठी कोणतेही भत्ते,निवृत्ती लाभ, कमिशन किंवा स्टॉक पर्यायांचा लाभ घेतला नाही. त्यापूर्वी व्यवस्थापकीय नुकसान भरपाईच्या पातळीत घट झाल्याचे वैयक्तिक उदाहरण देण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे वेतन २००८-०९ पासून १५ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होते. 2019-20 मध्ये 15 कोटींचा पगार मागील 11 वर्षांइतकाच होता.
कंपनीच्या संचालक मंडळात नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असलेल्या अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी 6 लाख रुपये सिटिंग फी जी २१-२२ मध्ये ५ लाख होती.आणि 2022-23 साठी आणखी 2 कोटी रुपये कमिशन कमावले.२०-२१ मध्ये नीता अंबानी यांना 8 लाख रुपये सिटिंग फी आणि 1.65 कोटी कमिशन मिळाले होते.