पुणे : पुणे स्थानकावर झुरळांमुळे रेल्वे तब्बल दोन तास थांबण्यात आल्याची घटना घडली आहे. १७६१३ हा रेल्वे क्रमांक असलेल्या पनवेल- नांदेड एक्सप्रेसमधील बी१ या एसी कोचमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळे असल्याने नागरिक हैराण झाले. त्यानंतर हा डब्बा पेस्ट कंट्रोल करण्यात आला. रेल्वेतील प्रवासी कैलास मंडलापुरेंनी व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
एसी कोचमध्ये झुरळ झाल्याने प्रवाश्यांनी तक्रार केली. आणि जोपर्यत झुरळांचा बंदोबस्त केला जाणार नाही, तोपर्यंत ट्रेन पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे तब्बल दोन तास रेल्वे पुढे जाऊ शकली नाही. पनवेलवरुन शनिवारी दुपारी ४ वाजता नांदेडला जाणारी ट्रेन निघाली. पण थोडं अंतर पार केल्यानंतर एसी बोगीमधील प्रवाशांना झुरळांचा त्रास होऊ लागला. बोगीमध्ये सर्वत्र झुरळ होते. बर्थवर, लोकांच्या कपड्यावर, टॉयलेटमध्ये झुरळे होती. आम्ही महागाचे तिकिट काढल्या नंतरही प्रवाशांना सुविधा व्यवस्थित न मिळाल्यामुळे सर्व प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला.