बुलढाणा जिल्हा परिषदेत ४९९ पदांकरिता भरती

    05-Aug-2023
Total Views |
zilha-parishad-buldhana-recruitment-2023

महाराष्ट्र
: राज्यातील विविध जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्याकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेतील ४९९ पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ही भरतीप्रक्रिया ४९९ रिक्त पदांकरिता असून यात विविध पदांसाठी उमेदवारास अर्ज करता येणार आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्हा परिषदेने ४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिध्द केली आहे.

दरम्यान, ५ ऑगस्ट पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२३ असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर २५ ऑगस्टपर्यंत रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद बुलढाणा भरती २०२३ ही भरती प्रक्रिया आयबीपीएसद्वारे आयोजित केली जाईल. या भरतीप्रक्रियेतून डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता ही विविध पदे भरली जाणार आहेत. तसेच, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मेकॅनिक, रिगमॅन (रोपमॅन), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे) पदे. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.