टीव्हीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता; वाढत्या मागणीचा परिणाम

    05-Aug-2023
Total Views |
tv-will-become-expensive-again-in-august

मुंबई
: देशांतर्गत टीव्हीचे दर ०५ ते १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे टीव्ही खरेदीदारांना आता आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ३१ ऑक्टोबरपर्यंत विनापरवानगी कॉम्प्युटर, लॅपटॉप यांच्या आयातबंदीवर स्थगिती आणली असनाताच आता मागणीत वाढ झाल्याने टीव्हीच्या किंमतीत वाढ होणार आहे. तसेच, देशांतर्गत उत्पादनामुळे टीव्ही विक्रीतदेखील फायदा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे टीव्ही उत्पादनात वाढ होताना मागणीत देखील वाढ झाली आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात टीव्हीच्या किंमतीत २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तसेच, गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांपर्यंत किंमती वाढल्या असून बाजारातील कच्च्या भागांच्या तुटवड्यामुळे कंपन्या आपला स्टॉक वाढविण्यासाठी किंमतीत वाढ निर्माण करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

व्हिडिओटेक्स इंटरनॅशनलचे संचालक अर्जुन बजाज म्हणाले की, पॅनेलच्या किमती गेल्या सहा महिन्यांत ५० ते ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि गेल्या महिन्यातच ०६ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्हिडिओटेक्स ही भारतातील आघाडीची मूळ उपकरणे उत्पादक आणि मूळ डिझाइन उत्पादक असून जी लॉयड, रियलमी, तोशिबा, ह्युंदाई, बीपीएल, वाईज, दैवा इत्यादींसाठी स्मार्ट टीव्ही तयार करतात.