उबाठा गटप्रमुख उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

    05-Aug-2023
Total Views |
UBT Gat Chief Uddhav Thackeray Birthday Ocassion

मुंबई
: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना शाखा क्र . २०१ अंतर्गत युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत वडाळा विधानसभेतील आर. ए. किडवाई रोड, किडवाई नगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिका दवाखाना येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य स्वयंसेविका यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणेकरीता आयोजीत करण्यात आलेला 'बॅग व छत्रीचे वाटप' हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

दरम्यान, मुंबई शहरातील तळागाळापासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत आरोग्याच्या मूलभूत सुविधा पोहचविण्याचे काम हे आरोग्य स्वयंसेविका करीत असतात. कोरोना काळात केवळ या आरोग्य स्वयंसेविकांमुळे संक्रमणावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते.
या कार्यक्रम प्रसंगी विभाग संघटिका, माजी महापौर श्रद्धाताई जाधव, विभाग संघटक राकेश देशमुख, माधुरीताई मांजरेकर, रवी घोले, विशाल जाधव, भाऊ करगुटकर, मोहम्मद हुसैन, दिपक पाटील, स्वप्नाली ठाकूर, स्मिता वाडेकर, सुनिता बळी, प्रमिला गुरखे, श्रध्दा तांबे, सुरेखा साळवी त्यांच्यासह निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. 

आरोग्य स्वयंसेविका समाजासाठी करीत असलेल्या सहाय्याप्रती शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना शाखा क्र . २०१ अंतर्गत कृतज्ञता समारोहाचे आयोजन केले.