न्युयॅार्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकणारे मुख्यमंत्री शिंदे पहिले नेते!

    05-Aug-2023
Total Views | 160

Shinde 
 
 
मुंबई : न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल कनाल यांचा फोटो झळकला आहे. येथे फोटो लागणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल हे काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात आले. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंसह, खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असा तिघांचा फोटो न्यूयॉर्क टाइम्समध्ये झळकला आहे.
 
न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर हा जगप्रसिद्ध आहे. या नावाजलेल्या पेपरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो झळकला आहे. शिवसैनिकांकडून यावर आनंद व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारीला झाला. त्याआधी ८ फेब्रुवारीच्या दिवशीही न्युयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारा बॅनर हाती घेतला होता.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121