मैत्रिणींनो ऐका! येतेयं मंगळागौर स्पर्धा… पहिलं बक्षिस ३ लाख ५१ हजार

    05-Aug-2023
Total Views |
 
Mangalore Competition
 
 
 
मुंबई : श्रावण महिन्यात होणाऱ्या मंगळागौरीच्या तयारीची लगबग सध्या शहरातील महिलांमध्ये दिसून येत आहे. यातच आता भाजपाकडुन मंगळागौर स्पर्धेचे आयेजन करण्यात आले आहे. विजेत्याचे पहिले बक्षिस ३,५१,००० तर दुसरे बक्षिस २,११,००० चे आहे. आपल्या गटाची नोंदणी करण्यासाठी अंतिम तारिख १६ ऑगस्ट सायं. ६ पर्यंत आहे.
 
 
स्पर्धेचे नियम व अटी :
 
  1. जास्तीत जास्त १४ महिला स्पर्धकांचा सहभाग.
  2. सादरीकरणासाठी प्रत्येक गटाला १० ते १२ मि. मिळतील.
  3. १० मि. आत सादरीकरण केल्यास बोनस गुण मिळणार.
  4. मराठी पारंपारिक वेशभुषा अनिवार्य.
  5. स्कीनिंग राऊंड १९ ऑग. ते २ सप्टें.
  6. अंतिम फेरी ३ सप्टें. २०२३ रोजी.