नूह हिंसाचार; मुस्लिम जमावाकडून 'अल्लाह-हू-अकबर' आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा

    04-Aug-2023
Total Views |
ASI Dharmendra FIR On Noah violence

नवी दिल्ली :
हरियाणाच्या मेवातमधील नूह येथे झालेल्ला हिंसाचारात अनेकांना आपले जीव गमवावे लागले असून राज्य सरकारकडून यासंदर्भात कारवाई सुरु आहे. दरम्यान, पोलीसांकडून केल्या जाणाऱ्या तपासातून अनेक नवे खुलासे केले जात आहेत. दरम्यान, नूह हिंसाचारात मुस्लिम जमावाकडून 'अल्लाह-हू-अकबर' आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच, पोलीसांनी या जमावाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलीसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

दरम्यान, हरियाणाच्या नूहमध्ये, कट्टरपंथी मुस्लिमांच्या जमावाने दि. ३१ जुलै रोजी जलाभिषेक यात्रेत सहभागी असलेल्या हजारो हिंदू भाविकांवर हल्ला केला. या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमधून अनेक तपशील समोर आले आहेत. हरियाणा पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक धर्मेंद्र यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आक्षेपार्ह घोषणा देत हिंसक जमावाने नल्हाड महादेव मंदिरात भाविकांवर हल्ला केला.

तसेच एफआयआरनुसार, गोळीबारात होमगार्ड बीर सिंग आणि त्रिलोक जखमी झाले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचे सर्व प्रयत्न करूनही जमाव पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत मंदिराकडे कूच करत राहिला. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. दरम्यान, एएसआय धर्मेंद्र यांच्या एफआयआरनुसार, कलम १४८, १४९, २९५अ, ३३२, ३५३, १८६, १८८, ४२७, ४३५, ३०७ आयपीसी, शस्त्रास्त्र कायद्याचे कलम २५ आणि नुकसान प्रतिबंधक कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ८००-९०० हल्लेखोर अज्ञात दाखवले आहेत.