डेंग्यू, मलेरियावर लवकरच लस येणार!

    31-Aug-2023
Total Views |
 
vaccine

मुंबई : कोविशिल्डच्या यशानंतर सिरम इन्स्टिट्यूटची नवीन लस लवकरच बाजारात येणार आहे. या लसीमुळे डेंग्यु आणि मलेरिया या आजारांवर नियंत्रण मिळणार आहे.
 
पावसाळ्यात डासांमुळे मोठ्या प्रमाणात मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांचे प्रमाण दरवर्षी वाढते. या आजारांवर औषधे उपलब्ध असली तरी लस अजून तयार करण्यात आलेली नाही. यामुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते.
 
भारताप्रमाणेच आफ्रिक देशातही डेंग्यू आणि मलेरियाची साथ कायम येते. या आजारांवर औषधे उपलब्ध असली तरी लस अजून तयार करण्यात आलेली नाही. या परिस्थितीचा आढावा घेऊन सिरम इन्स्टिट्यूट डेंग्यु आणि मलेरियासाठी लस बनवत आहे.
 
त्यामुळे येत्या वर्षभरात ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती सिरम इस्टिट्यूटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी दिली.