मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्रातीलच नाही तर परदेशातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारा फिल्टर पाड्याचा बच्चन अर्थात अभिनेता गौरव मोरेची ट्रेन सध्या सुसाट धावत आहे. नुकताच अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या 'परिनिर्वाण' या आगामी चित्रपटात तो झळकणार असल्याची माहिती समोर येत होतीच आणि त्याचा आगामी 'अंकुश' हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या मार्गात असताना गौरव हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
गौरव मोरेच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘संगी’ असे आहे. या चित्रपटात गौरवसह विद्या मालवडे, संजय बिश्नोई आणि शाकिब हाश्मी हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमीत कुलकर्णी करणार आहेत.