मेडटेक लाईफच्या वतीने मुंबई पोलिसांच्या तणाव व्यवस्थापनासाठी पुढाकार

    31-Aug-2023
Total Views |
Medtech
 
 
 
 
मेडटेक लाईफच्या वतीने मुंबई पोलिसांच्या तणाव व्यवस्थापनासाठी पुढाकार
 
 

मुंबई :  मेडटेक लाईफ या भारतातील जुन्या व विश्वासू हेल्थकेअर कंपनीने नुकताच पोलीसांच्या शारीरिक मानसिक ताणतणावाच्या जनजागृतीसाठी शहरातील  २१  पोलिस स्थानकात कार्यशाळा घेतली.  याव्यतिरिक्त ताणतणाव, दबाव यावर मात करण्यासाठी कार्यशाळा घेतानाच 'स्ट्रेस मॅनेजमेंंट ' वर परिसंवाद घेतला.  याप्रसंगी मुंबईतील २१ स्थानकात बीपी मॉनिटरिंग मशीन बसवण्यात आले आहे. याचा नियमित आढावा घेण्यासाठी या कार्यशाळेचा उद्देश राहणार आहे.
 
 
सतत गुन्हेगारी विश्वाशी तोंड देताना व वेगवेगळ्या बंदोबस्त, सुरक्षा देताना पोलिसांच्या प्रकृतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते. जास्तीत जास्त ह्रदय विकार, ब्लड प्रेशर ताणतणावाशी निगडित असतात.  मेडटेक लाईफ ने एक पाऊल पुढे टाकत या योजनेसाठी पुढाकार घेतला.
 
 
यासंबंधी बोलताना,  मेडटेक लाईफ चे चेअरमन श्री रजनीकांत शहा म्हणाले, ' जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमच्या मेडिकल उपकरण बनवण्यासाठीचे प्रमुख उद्दिष्ट असते.  समाजाचे व आपल्या घरदार कुटुंबांचे रक्षण करणारे पोलिस मात्र ताणतणावात वावरतात.  हा उद्देश पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे.  ताणतणाव व त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी दूर करून हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी बीपी चेकिंग ही महत्वाची प्रकिया ठरते.'
 
 
'आम्ही बृहन्मुंबई पश्चिम विभागाचे एसीपी परमजीत धईया यांचे मनापासून आभार मानतो.  त्यांनी आम्हाला या उपक्रमासाठी संपूर्ण पाठिंबा दिला.  परिणामी आम्ही आशा करतो , की  या वर्कशॉपमुळे आरोग्य व खबरदारी यावर मेसेज  पोहोचवायला कारणीभूत ठरलो.'  असे उद्गार याप्रसंगी मेडटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव शहा  यांनी  काढले.
 
 
हा उपक्रम १२ सप्टेंबर २३ पर्यंत चालणार आहे असे कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले आहे.