पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का ; ३०० पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
31-Aug-2023
Total Views | 45
मुंबई: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची गळती अद्याप सुरूच आहे. यानंतर आता पंढरपूरमधील ठाकरे गटाचे जवळपास ३०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
पंढरपूरचे शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह सरपंच आणि इतर सदस्यांच समावेश आहे.
पंढरपूरचे शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पंढरपूरमध्ये मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. या पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेक्षाने शिंदे गटाचे पाठबळ वाढले आहे.