मालेगाव : मालेगावातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. येथील एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. टिपू सुलतानचा फोटो स्टेटवर ठेवल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मालेगावातील एक तरुण आपल्या तीन मित्रांसोबत बाहेर गेला असता एक संशयित तरुण त्यांच्याजवळ आला. या आरोपीने शिवीगाळ करत तरुणावर चाकूने हल्ला केला. १५ ऑगस्टला साजिद नावाच्या मुलाने टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याने हा वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी संशयित तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.