इंडियात येता का आंबेडकरांना विचारावं लागेल : ठाकरे
30-Aug-2023
Total Views | 68
मुंबई : मुंबईत I.N.D.I.A आघाडीची बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांवर भाष्य केलं. इंडिया आघाडीत येता का आंबेडकरांना विचारावं लागेल. असं ठाकरे म्हणाले आहेत.
वंचितला निमंत्रण देण्यात आलं आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला. तेव्हा आम्ही शिवसेना ठाकरे गटाबरोबर आहोत. आता आम्हाला निमंत्रण दिलं का नाही हे काँग्रेसला विचारावं लागेल. 2019 मध्ये काँग्रेसला ऑफर दिली होती. काँग्रेस आमंत्रण देत नाही म्हणून आमची आघाडी झाली नाही. आमचे वकील उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी भूमिका या बैठकीत मांडली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, "प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत आमची युती आहे. इंडिया आघाडीत त्यांना घेण्याविषयी चर्चा होईल. आंबेडकर यांची इंडिया आघाडीत येण्याची इच्छा आहे का, ते विचारावे लागेल." अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली.