मुंबई : राज्यभरात रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी राज्याचे कॅबिनेट आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लोअर परेल येथे रक्षाबंधनानिमित्त मालवणी येथील महिलांना आमंत्रित केले होते. यावेळी मालवणीतील महिलांनी त्यांना राख्या बांधल्या आणि औक्षण केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांसह पालकमंत्री लोढा यांचे दृढ स्नेहबंध असून परिसरात होणाऱ्या सामाजिक उपक्रमांना आवर्जून उपस्थित राहून येथील हिंदू समाजाला आधार देण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले आहे. यावेळी आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या, हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या माझ्या भगिनींच्या संरक्षणासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन, असे वचन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.