मुंबई : भारतीय सैन्यदलाकडून मुंबईत 'सलाम मुंबई' या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली. ही भेट सह्याद्री अतिथीगृहात झाली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांना राज्य सरकार आणि मुंबईतील यंत्रणा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यार असल्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "नागरिकांना हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पाहता यावा यासाठी चांगले नियोजन केले जाईल."