मुंबई : अल्पशिक्षित उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची नामी संधी चालून आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सरकारी नोकरीची संधी, शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक पदांची मोठी भरती होणार आहे. तसेच, या भरतीप्रक्रियेमुळे राज्यातील अल्पशिक्षित उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभाग अंतर्गत ही संधी उपलब्ध झाली असून तब्बल ४०१० रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत गट ‘ड’ संवर्गातील भरतीबाबत यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झाली आहे. तसेच, या पदभरतीसाठी अर्ज करण्यास १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दिलेल्या मुदतीच्या आत आवश्यक कागदपत्रांनुसार इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत. तसेच, भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट http://arogya.maharashtra.gov.in ला भेट द्या.