'स्मार्ट' बहिणीच्या हातावरील मेहंदीची सोशल मीडियावर चर्चा

    30-Aug-2023
Total Views |

Mehendi


मुंबई :
आज राखी पौर्णिमा म्हणजेच बहीण-भावाच्या प्रेमाचा सण. आजच्या दिवसात घरोघरी रक्षाबंधन साजरे केले जात असते. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधून आपलं नातं अतूट बनवत असते, तर भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो.
 
मात्र, यापलीकडे प्रत्येक बहिणीला आपल्या भावाकडून काहीतरी भेटवस्तू अपेक्षा असते आणि भाऊ आपल्या बहिणीची ही अपेक्षा पुर्ण करतोही. आजच्या स्मार्ट युगात सण, उत्सवदेखील स्मार्ट पद्धतीने साजरे केले जातात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अशाच एका स्मार्ट बहिणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
या व्हिडीओमध्ये एका बहिणीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या हातावर मेहंदी काढली आहे. परंतु, ही मेहंदी साधी सुधी नसून यात तिने क्युआर कोड रेखाटला आहे. विशेष म्हणजे हा क्युआर कोड स्कॅन केला असता तो स्कॅनही होत आहे. मेहंदीमध्ये क्युआर कोड रेखाटने आणि तो केवळ डिझानपुरता न राहता स्कॅन होणे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.